Alandi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा; आरोपीला अटक

One accused of molesting a minor girl; Accused arrested : पीडित मुलगी कॉलेजला जात असताना आरोपीने तिचा मोटारसायकलवरून वारंवार पाठलाग केला.

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलगी कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करीत तिच्या घरासमोर येऊन तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2019 पासून 27 जुलै 2020 या कालावधीत चिंबळी येथे घडला.

शुभम प्रदीप कदम (रा. आंबेडकर नगर, चिंबळी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेजला जात असताना आरोपीने तिचा मोटारसायकलवरून वारंवार पाठलाग केला. तसेच मुलीच्या घरासमोर देखील चकरा मारल्या.

तसेच आरोपीने मुलीसमोर येऊन ‘तू मला खूप आवडते. माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण दोघे लग्न करू’ असे म्हणत तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

पोलिसांनी शुभम याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 354 (ड), 504, 506, 509, पोक्सो कलम 8, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.