Ganja : गांजा सेवन प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज  – सार्वजनिक ठिकाणी बसून गांजाचे सेवन करत (Ganja) असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 15) दुपारी काळाखडक, वाकड येथे करण्यात आली.

अरविंद गोरख साठे (वय 22, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सागर (पूर्ण नाव माहिती नाही. रा. भाटनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ganja) याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Jambwade Grampanchayat : जांबवडे ग्रामपंचायतीमार्फत फार्मासिटिकल्स कंपनीला निवेदन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद हा काळाखडक येथील एका मशिदीसमोर गांजा ओढत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.(Ganja) त्यानुसार पोलिसांनी छापा मारून अरविंद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सहा ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य मिळाले. त्याने हा गांजा भाटनगर येथे राहणाऱ्या सागर नावाच्या व्यक्तीकडून आणला असल्याचे तपासात समोर आल्याने सागर विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.