Traffic police beaten : वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

 एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिसाला (Traffic police beaten) एका तरुणाने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी एम एम चौक, काळेवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

वैभव बबन गायकवाड (वय 19, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश रामचंद्र जाधव (वय 52) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pandit Dindayal Upadhyay Job fair : पंडीत दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात ५६० उमेदवारांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश जाधव हे सांगवी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शनिवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास ते काळेवाडी येथील एम एम चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. आरोपी येत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली. (Traffic police beaten) त्या कारणावरून वैभव गायकवाड याने पोलीस शिपाई जाधव यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली. काचेची बियरची बाटली काढून जाधव यांना मारली. यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी विभाग गायकवाड याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.