Pimpri : भोसरी येथील एकाला कोरोनाची लागण

one more person from Bhosari test positive for coronavirus while 3 non PCMC residents also test positive for covid19

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज, रविवारी (दि. 24) सकाळी आलेल्या अहवालात ही माहिती मिळाली आहे. तसेच शहराच्या बाहेरील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांवर पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या 312 वर पोहोचली आहे.

रविवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार, पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर जुन्नर आणि वारजे येथील तिघांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या तिघांवर पिंपरी चिंचवड शहरात उपचार सुरू होते.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेर राहणाऱ्या 25 जणांवर सध्या पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

आजवर शहरातील सात तर शहराच्या बाहेरील नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात सध्या 114 रुग्ण सक्रिय आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 169 तर शहराच्या बाहेरील रहिवासी परंतु शहरात उपचार घेतलेल्या 17 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या 22 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.