Pimpri : राज्यातील रेशनिंग दुकानदार 1 जूनपासून धान्य वितरण बंद करणार 

Pimpri: Ration shopkeepers in the state will stop distributing foodgrains from June 1

एमपीसी न्यूज – रेशनिंग दुकानदार यांना विमा संरक्षण देण्याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे 1 जून पासून राज्यातील रेशनिंग दुकानदार स्वस्त धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी घेतला आहे.

कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश पाटील यांनी याबाबतचे निवेदन अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना केले असून 1 जूनपासून धान्य वितरण न करण्याच्या गजानन बाबर यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

रेशनिंग दुकानदार, कामगार व पुरवठा अधिकारी यांना विमा संरक्षण दिले नाही तर वितरण बंद करण्याचा इशारा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शोपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिला होता. या मागणीवर अद्याप काही निर्णय न झाल्यामुळे 1जून पासून राज्यातील रेशनिंग दुकानदार स्वस्त धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी घेतला आहे.

कृषी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज खोमणे व पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश बाबर यांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like