Hadapsar News: व्याजाच्या पैशांवरुन सावकाराचा खून

एमपीसी न्यूज : सतत पैशाचा तगादा लावल्याने सावकाराचा कुऱ्ह्राडीने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना हडपसर भागात उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

एकीकडे पुणे पोलिस अवैध सावकारांवर कारवाई करीत असले तरी  सावकारांचा जाच कमी होताना दिसत नाही. याप्रकरणी पोलिसांनी गणेश सुरेश खरात (वय 35,रा.फुरसुंगी) असे अटक केलेल्याचे नाव आहे तर युवराज बाबुराव जाधव (वय 34) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज जाधव हा फुरसुंगीमधील पापडे वस्तीत रहातो. तो व्याजाने पैसे देत असे. गणेश खरात हा कार चालक म्हणून काम करीत होता. त्याने युवराजकडून 20 हजार रूपये व्याजाने घेतले होते.मात्र पैशावरून त्यांच्यात सतत वाद होत. घटनेच्या दिवशी युवराज याने गणेशचा पैशावरून अपमान केला. त्याचा गणेशला राग आला. त्यातून त्याने युवराजचा खून केल्याचे सांगितले, असे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.