Dehuroad Crime News : शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष देत विद्यार्थिनीची 90,350 रूपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष देत विद्यार्थिनीची 90,350 रूपयांची फसवणूक केली. देहूरोड परिसरात 01 ते 02 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली.

याबाबत मोणिसा आयुब खान (वय 20, रा. उर्दु शाळेजवळ, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून संजित ठाकर, जगदीश कुमार नडीयाल या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोणिसा खान हिला आरोपींनी फोन करून पाच लाख रूपये शैक्षणिक कर्ज देण्याचे आमिष दाखवले. कर्जासाठी प्रोसेसिंग फी, सिक्युरिटी चार्ज, टॅक्स, आरबीआयचे पाच टक्के व्याजदर यासाठी 90 हजार 350 रूपये ऑनलाईन घेऊन फसवणूक केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.