Pimpri : टेम्पोचा दरवाजा उघडा ठेवणे चालकाला पडले महाग; लाखाची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – टेम्पोमध्ये पेपरचे गठ्ठे भरत असताना टेम्पो चालकाने उघडा ठेवलेल्या समोरच्या दरवाजातून आतमध्ये घुसून चोरट्याने सीटवर बॅगेत ठेवलेली रोकड, सोन्याची अंगठी असा 1 लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान चिंचवड स्टेशन येथे घडली.

बाळू मारूती थोपडे (वय-32, रा. सनसाईन अव्हेन्यू, सिंहगड रोड, धायरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोपडे व त्यांचे चुलते त्यांच्या टेम्पोमध्ये चिंचवड स्टेशन येथे पेपरचे गठ्ठे भरत होते. टेम्पोचा समोरचा दरवाजा लॉक करण्याचे थोपडे विसरून गेले. उघड्या दरवाज्याच्या काचेवाटे अज्ञात चोरट्याने हात घालून सीटवर ठेवलेल्या बॅगेतील 90 हजारांची रोकड, 5 ग्रॅम वजनाची 10 हजारांची सोन्याची अंगठी, कागदपत्रे असा 1 लाखांचा ऐवज चोरून नेला. फौजदार सिरसाठ तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.