Operation Nanhe Farishte : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत वर्षभरात 1064 भरकटलेल्या मुलांची सुटका

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ)ने मागील एका वर्षात 1064 भरकटलेल्या मुलांची सुटका केली. या मुलांचा जीव वाचवून रेल्वेने मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. यामध्ये भरकटलेले, घर सोडलेले आणि इतर कारणांनी रेल्वे स्थानकावर आढळलेल्या मुलांचा (Operation Nanhe Farishte) समावेश आहे.

 

आरपीएफ मध्य रेल्वेने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने 1064 मुलांची मध्य रेल्वेच्या स्टेशनवरून सुटका केली. यामध्ये ‘चाइल्डलाइन’ सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मिलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे.

Pimpri-chinchwad : निवेदक म्हणून मिळालेला माझा हा पहिलाच पुरस्कार – मंजिरी धामणकर

जी मुले भांडणामुळे, कौटुंबिक समस्यांमुळे, चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येतात. त्यांना प्रशिक्षित आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी शोधले. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या  उदात्त आणि निस्वार्थी सेवेबद्दल अनेक पालकांनी रेल्वेची कृतज्ञता आणि आभार व्यक्त केले आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 312 मुलांची सुटका केली. भुसावळ विभागात सर्वाधिक 313 मुलांची सुटका केली. पुणे विभागाने 210 मुलांची सुटका केली. नागपूर विभागाने 154 मुलांची सुटका केली. सोलापूर विभागाने 75 मुलांची (Operation Nanhe Farishte) सुटका केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.