Drug Consumption: पवना नदीकाठी गांजा सेवन करणाऱ्या तीघांना अटक

एमपीसी न्यूज : दापोडी येथे पवना नदीच्या कडेला गांजा सेवन करणाऱ्या तिघांच्या तर गांजा विक्री प्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Drug Consumption) ही कारवाई सोमवारी (दि. 25) दुपारी  करण्यात आली.

 

समीर जयवंत खैरनार (वय 27, रा. दापोडी), राकेश सुरेश लाखन (वय 37, रा. पिंपळे गुरव), संदीप ज्ञानेश्वर नारबेकर (वय 37, रा. दापोडी) आणि एक महिला (रा. ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक प्रसाद कलाटे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर, राकेश आणि संदीप यांनी आरोपी महिलेकडून गांजा विकत आणला. सोमवारी दुपारी तिघेजण दापोडी येथे एसटी वर्कशॉपच्या भिंतीलगत पवना नदीच्या कडेला गांजा ओढत बसले. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. (Drug Consumption) त्यात 19 ग्रॅम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य असा 495 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.