Book Publication: रंगा दाते लिखीत 1948चं अग्नितांडव पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज :  आम्ही सारे ब्राह्मण नियतकालिकाच्या वतीने प्रकाशित (Book Publication) आणि रंगा दाते लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज (मंगळवारी) डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

 

यावेळी लेखक रंगा दाते, प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र चित्तपावन संघाचे अशोक वझे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. शेवडे म्हणाले की, महात्मा गांधीच्या हत्येनंतर 1948 मध्ये समस्त ब्राह्मण समाजावर झालेले अत्याचार विसरता येणार नाही, हा रक्तरंजित इतिहास पुढच्या पिढीला समजला पाहिजे. (Book Publication) यासाठीच 1948 चं अग्नितांडव हे पुस्तक वाचवतही नाही आणि सोडवतही नाही, असे झाले आहे. देशातील अशा सर्वच दबलेल्या विषयांवर आता खरा इतिहास लिहीला जातोय, त्याचा अनेक तथाकथित पुरोगाम्यांना त्रास होऊ लागला आहे, अशा परखड शब्दात ज्येष्ठ निरुपणकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी त्यांचे विचार मांडले.

 

Drug Consumption: पवना नदीकाठी गांजा सेवन करणाऱ्या तीघांना अटक

 

लेखक रंगा दाते यांनी त्यांचा अनुभव मांडताना सांगितले की, 1948 मध्ये ब्राह्मण समाजावर झालेल्या अत्याचाराची सल अजूनही खोलवर आहे. हे पुस्तक पूर्णपणे खर्‍या इतिहासावर आधारीत आणि अनुभवांवर आधारीत आहे. प्रामुख्याने पश्‍चिम महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाची घरेदारे जाळली गेली, महिलांवर अत्याचार केले गेले, अनेकांना बेघर केले गेले. (Book Publication) याची दाहकता पिढ्यान पिढ्या मनात बोचत राहिली आहे. ब्राह्मण समाजाच्या झालेल्या या भयंकर नुकसानीची भरपाई सरकारने आता तरी केली पाहिजे. त्याला वाचा फोडण्याचे काम या पुस्तकाने केले आहे. ब्राह्मण समाजाने तर सर्वच समाजाच्या उद्धारासाठी कायम काम केले आहे, याचाही विचार केला गेला पाहिजे.

 

तर अशोक वझे यांनी ब्राह्मण समाजाने संघटीत होऊन आपल्यातील समस्यांवर काम केले पाहिजे. ब्राह्मण तरुणांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी  अजय दाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.