PCMC : महापालिकेत दिवाळीनंतर 368 कर्मचारी रुजू होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी दिवाळीनंतर प्रसिद्ध केली जाणार असून महिनाअखेरिस 368 उमेदवारांना विविध पदांवर रुजू करून घेण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांच्या 368 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. परीक्षेनंतर 11 पदांसाठीच्या 35 जागांचा निकाल सात ऑगस्टला जाहीर झाला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी 30 हजार 581 जणांनी परीक्षा दिली होती. त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला.

Chinchwad : ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातर्फे आपुलकी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना दिवाळीनिमित्त भेट वस्तूचे वाटप

आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सादर केलेली प्रमाणपत्रे शासकीय (PCMC) मान्यताप्राप्त संस्थेचे आहेत की नाही हे तपासणे सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीची मंजुरी घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. त्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.