Alandi : गोविंद देव गिरी यांनी इंद्रायणी काठी उपोषणास बसलेल्या भगवान महाराजांची घेतली भेट

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील इंद्रायणी नदी घाटावरती (हवेली विभाग) भव्य राष्ट्र कल्याण सामुदायिक जन आंदोलन आमरण उपोषण ह. भ. प. भगवान महाराज कोकरे दि. 1 नोव्हेंबर पासून करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा (दि.11)आजचा हा अकरावा दिवस सुरू आहे.

PCMC : महापालिकेत दिवाळीनंतर 368 कर्मचारी रुजू होणार

आज स्वामी गोविंद देव गिरी महाराज कोष्याध्यक्ष राम मंदिर न्यास अयोध्या, यांनी इंद्रायणीतीरी उपोषण कर्ते भगवान महाराज कोकरे यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.

तसेच आळंदीतील वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांनी त्यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली.

संपूर्ण भारत देशामध्ये समान नागरी कायदा व समान शिक्षण कायदा (Alandi) लागू करणे. जाती आधारित असलेले आरक्षण रद्द करून आर्थिक निकषांवर व गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांने पिकविलेल्या शेत मालाला कायमस्वरूपी हमीभाव देण्यात यावा. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या नद्यांमधील पाणी माणसाने पिण्या इतके शुद्ध असावे. अश्या इतर विविध मागण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.