Pimpri: पालिका आयुक्त हर्डीकर रजेवर जाणार; पीएमआरडीएच्या गित्ते यांच्याकडे पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर येत्या 11 मे पासून रजेवर जाणार आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार पीएमआरडीएचे प्रमुख किरण गित्ते यांच्याकडे दिला जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत रूजू झाल्यापासून आयुक्त हर्डीकर पहिल्यांदाच मोठ्या रजेवर जाणार आहेत. कमी कालखंडाची रजा असेल तर अतिरिक्त आयुक्त कारभार सांभाळतात. मात्र, अधिक कालखंडाची रजा असेल तर आयुक्त दर्जा असणा-या व्यक्तीकडे पदभार दिला जातो. तीन आठवड्यांच्या कालखंडात महापालिकेची सर्वसाधारण सभा, विविध विषय समितीच्या सभा आहेत.

आयुक्त हर्डीकर गुरूवारपासून रजेवर जाणार असून शुक्रवार 11 मे पासून 1 जूनपर्यंत सुटीवर आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा पदभार पीएमआरडीचे किरण गित्ते यांच्याकडे सोपविला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.