Pimpri : पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याचा सायकलिंगमध्ये देशात पहिला क्रमांक

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “फ्रीडम टू वॉक – सायकल – रन” या (Pimpri) मोहिमेतील पहिल्या भागात देशपातळीवर यश संपादन करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या सत्कार करण्यात आला.  महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दिक्षीत यांचा सायकलिंग मध्ये देशात प्रथम क्रमांक आला.  

सत्कारार्थींमध्ये शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, कनिष्ठ अभियंता अमित दिक्षीत, स्वप्निल शिर्के आणि संगणक चालक अनंत चुटके यांचा समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त आधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्यासह सर्व उपआयुक्त, सह शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागप्रमुख सत्कारावेळी उपस्थित होते.

Hinjawadi : महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात

या मोहिमेमध्ये देशभरातून सुमारे 30 विविध शहरातून 150 सिटी लिडर्सने भाग घेतला.  हा उपक्रम 1 फेब्रुवारी ते 15 मार्च 2023 असा एकूण 45 दिवस चालला.(Pimpri) या पूर्ण उपक्रमात सहभाग घेतलेल्या सर्वांकडून एकूण 68 हजार किलोमीटर अंतर पार केले.  एका अर्थाने पृथ्वीला 1.5 प्रदक्षिणा घातल्या.  तसेच एकूण उपक्रमातून सुमारे 14 हजार किलोमीटर अंतराचे मोटार वाहतुकमध्ये चालणे, सायकलिंग अथवा धावण्याने बदलले.

यात पिंपरी-चिंचवड शहराने देखील आपला सहभाग नोंदविला होता.  या शहरातून एकूण 10 सिटी लिडर्सने यात सहभाग नोंदविला आहे.  (Pimpri) या पूर्ण उपक्रमाच्या शेवटी 19 एप्रिल 2023 रोजी या उपक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला.  यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर सायकलिंग आणि रनिंग मध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर व तसेच चालण्यात 10 व्या क्रमांकावर आले.  तसेच वैयक्तिक पातळीवर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दिक्षीत हे सायकलिंग मध्ये देशात प्रथम क्रमांक व संगणक चालक अनंत चुटके यांनी चौथा क्रमांक पटकावला. तसेच रनिंगमध्ये कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांचा देशात द्वितीय क्रमांक व स्वप्निल शिर्के यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.