Hinjawadi : महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणारे टोळके पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – बेंगलोर-मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी पकडले. (Hinjawadi) दहा दिवस बावधन ते लवासा, पौड, खडकवासला या भागातील 65 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवून वेषांतर करून पोलिसांनी तिघांना पकडले आहे. त्यांच्याकडून एक लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रामदास बबन कचरे (वय 22, रा. डोणजे गाव, ता. हवेली. पुणे. मूळ रा. महाड, जि. रायगड) याला अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

चांदणी चौक, बावधन येथे 1 एप्रिल रोजी रात्री यश मळगे (वय 30, रा. कोथरूड) हे फोनवर बोलत जात असताना त्यांना कोयत्याने मारून जबरदस्तीने त्यांची दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी दहा दिवस चांदणी चौक, (Hinjawadi) बावधन, लवासा, पौड, खडकवासला या भागातील 65 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातून आरोपी रामदास कचरे याची ओळख पटली. त्यानंतर त्याचा वेषांतर करून हिंजवडी पोलिसांनी पाठलाग केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असे.

Bharat Gaurav Train : पुण्यातून 28 एप्रिलला धावणार पहिली ‘भारत गौरव ट्रेन’

बापूजी बुवा मंदिर येथे तो त्याच्या साथीदारांसोबत आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून रामदास याच्यासह तिघांना ताब्यात घेतले.(Hinjawadi) त्यांनी बावधन येथे एकाला लुटले असल्याचे सांगितले. तसेच तिघांनी मिळून हिंजवडी, पौड आणि हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केले आहेत.

तिघांकडून चार दुचाकी, कोयता, रोख रक्कम, सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सुभाष गुरव, नरेश बलसाने, सागर पंडित यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.