MPC News Special : महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात होताहेत सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे उपचार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (MPC News Special) थेरगाव रुग्णालयाचा कायापालट केला आहे. नव्या रूपात रुग्णालयात सुरु झाले असून रुग्णालयात माफक दरात उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर थेरगाव रुग्णालयात स्त्रीरोग आणि अन्य विविध आजारांच्या शस्त्रक्रिया सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा दरांमध्ये केल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णांसह इतर परिसरातील रुग्ण देखील थेरगाव रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. दररोज सुमारे एक हजार रुग्णांची इथे तपासणी केली जाते. 200 बेड असलेल्या रुग्णालयात चार ऑपरेशन थिएटर आहेत. सर्वसामान्य रुग्णांना पूरक माहिती मिळण्याच्या अनुषंगाने ‘एमपीसी न्यूज’ने थेरगाव रुग्णालयाचा आढावा घेतला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव रुग्णालयात 200 बेडचे रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयामध्ये प्रसुती गह, बालरोग विभाग, मानसोपचार विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, अस्थिरोग विभाग, कान-नाक-घसा विभाग, नेत्र विभाग, सर्दी-ताप-खोकला, दंत विभाग, फिजिओथेरपी, पॅथॉलॉजी, एक्स-रे, सोनोग्राफी अशा विविध सुविधा पुरविल्या जातात. त्यामुळे या रुग्णालयामध्ये मोठया प्रमाणात रुग्णांची गर्दी होते. हे रुग्णालय सर्व सोयी- सुविधायुक्त असल्याने या रुग्णालयामध्ये राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येतात.

महापालिकेचे थेरगाव रुग्णालय जून 2021 मध्ये पूर्ण क्षमतेने सुरु झाले. सुरुवातीला (MPC News Special) रुग्णांचे प्रमाण कमी होते. मात्र आता दररोज सुमारे एक हजार रुग्ण विविध आजारांसाठी रुग्णालयात येतात. तसेच रुग्णालयात स्त्रीरोगाशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया केल्या जातात. थेरगाव रुग्णालयात अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या 22 आहे. चार शस्त्रक्रिया विभाग आहेत.

कान-नाक-घसा विभाग पूर्ण क्षमतेने सुरु असून कानाच्या शस्त्रक्रियांमध्ये मध्यकर्णपटलाची सुघटन शस्त्रक्रिया (टायम्पॅनोप्लास्टी), कानामध्ये पू होणे (मॉडिफाईड रॅडिकल मास्टोइडेक्टॉमी), ऐकण्याची क्षमता सुधारणे (स्टेपॅडोटोमी), कानाच्या मधल्या भागात जमलेला द्रव काढणे (मायरिंगोटॉमी विथ ग्रोमेट) आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात.

नाकाच्या शस्त्रक्रियांमध्ये नाक सरळ करणे (सेप्टोप्लास्टी), नाकाची प्लास्टिक सर्जरी (राइनोप्लास्टी), सायनसशी संबंधित शस्त्रक्रिया (फंक्शनल सायनस सर्जरी) आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात. घशातील गलग्रंथी (टॉन्सिल) काढून टाकणे, नाकातून घशाकडे येणाऱ्या ग्रंथी (एडिनॉइड), पेरीटॉन्सिलर ऍबसेस, कंठग्रंथीची शस्त्रक्रिया (थायरोग्लॉसल सिस्ट एक्सिशन), थायरॉईड आणि अन्य शस्त्रक्रिया केल्या जातात.

Bharat Gaurav Train : पुण्यातून 28 एप्रिलला धावणार पहिली ‘भारत गौरव ट्रेन’

याशिवाय हर्निया, कर्करोग, मूळव्याध, मधुमेह, आतड्याची शस्त्रक्रिया अशा इतरही शस्ज्ञक्रिया केल्या जातात. स्त्रीरोगतज्ज्ञ शस्ज्ञक्रियामध्ये सिझेरियन सेक्शन, गर्भाशयाची पिशवी काढणे, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, तीन महिन्यांपर्यंत गर्भपात या सर्व शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जातात.

महापालिकेच्या रुग्णालयात आत्यधुनिक सोयी – सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नागरिकांचा महापालिकेच्या रग्णालयात जाण्याचा कल वाढला आहे. तसेच रुग्णालयात होणाऱ्या उपचारांसाठी सर्वसामान्यांना परवडणारे दर असल्यामुळे लहानांपासून मोठयापर्यत सर्व स्तरातील लोक उपचार घेतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.