Bharat Gaurav Train : पुण्यातून 28 एप्रिलला धावणार पहिली ‘भारत गौरव ट्रेन’

एमपीसी न्यूज : भारतीय रेल्वेने आता धार्मिक पर्यटनावर भर दिला आहे. धार्मिक पर्यटनासाठी रेल्वेकडून विशेष पर्यटन गाड्या सोडल्या जात आहेत. (Bharat Gaurav Train) याचबरोबर धार्मिक यात्रांचे आयोजनही रेल्वेकडून केले जात आहे. रेल्वेने धार्मिक पर्यटनासाठी भारत गौरव यात्रा सुरू केली आहे. या यात्रेची 28 एप्रिलपासून पुण्यात सुरूवात होत आहे.या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशांमध्ये देशातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक तीर्थस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळत आहेत.

भारत गौरव’ रेल्वेसेवा आतापर्यंत मुंबईतून सुरू होती. मात्र आता ती सेवा पुण्यातूनसुध्दा सुरू झाली आहे. 28 एप्रिल रोजी पुण्यातून पहिली ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ सोडण्यात येणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या ट्रेनचे उद्घाटन करणार आहे. ही ट्रेन दहा दिवस देशातील मुख्य धार्मिक स्थळे दाखवणार आहे.

Talegaon Dabhade : पर्यावरणपूरक उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा पुढाकार

ही गाडी पुण्यातून जगन्नाथ पुरी,कोलकत्ता,गया, वाराणसी (Bharat Gaurav Train) आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या आयआरसीटीसीकडून या सेवेचे नाव ’पुरी गंगासागर दिव्य काशी यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे

भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2021 मध्ये भारत गौरव योजना सुरु केली.(Bharat Gaurav Train) देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” आणि “देखो अपना देश” या उपक्रमांतर्गत भारत गौरव पर्यटक ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला आहे. या डिलक्स एसी ट्रेनमध्ये एकूण 156 पर्यटक प्रवास करु शकतात. यात 1 एसी आणि 2 एसी कोचची व्यवस्था आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.