Pimpri News: मुळा नदीचे पुनरूज्जीवन; 276 कोटींच्या खर्चाला स्थायीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri News) हद्दीतून वाहणार्‍या मुळा नदी पुनरूज्जीवनासाठी 276 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका कार्यक्षेत्रातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. पवना व इंद्रायणी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी 200 कोटींचे कर्जरोखे उभारण्यात येणार आहे. पिंपरी- चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्या वाहतात. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी 44.40 किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी 14.20 किलोमीटर आहे.

महापालिका हद्दीतील नदीच्या पुनरूज्जीवनासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. 18 नोव्हेंबर 2022 रोजी 320 कोटी 85 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. निविदा स्वीकृती कालावधी 18 नोव्हेंबर ते 5 जानेवारी 2023 होता. निविदेला 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. या कालावधीत 4 निविदाकारांनी सहभाग घेतला.

Pimpri : पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याचा सायकलिंगमध्ये देशात पहिला क्रमांक

त्यात बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, न्याती इंजिनिअर्स एॅण्ड कन्सलटंस प्रा. लि, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर (Pimpri News) या चार जणांच्या निविदा आल्या. त्यात अजवानी इन्फ्रास्ट्रक्चर यांची निविदा अपात्र झाली. उर्वरित तीन निविदांपैकी बी.जी.शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निविदा दरापेक्षा 14.25 टक्क्यांनी कमी दराने आली. रॉयल्टी चार्जेस, मटेरियल टेस्टींग चार्जेसह 276 कोटी 65 लाख 43 हजार 378 रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.