Pimpri News : महापालिकेची पर्यावरणाबाबतची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच – दिगंबर काशिद

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पर्यावरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. चिखली, कुदळवाडी या परिसरामध्ये लाखो टन प्लास्टिक, फायबर, अविघटनशील घातक पदार्थ हे जाळले जातात. (Pimpri News) त्याबाबत महापालिका प्रशासन काहीच कारवाई करत नाही असा आरोप करत महापालिकेच्या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचा जाहीर विरोध पर्यावरणासाठी काम करणारे दिगंबर काशिद यांनी केला आहे. महापालिकेचा पर्यावरण विभाग हा फक्त हप्ते वसूल करण्यासाठीच आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दिगंबर काशिद म्हणाले की, महानगरपालिका पर्यावरण विषयी असलेली सहानुभूती ही फक्त गणेश उत्सवामध्येच व्यक्त करते. पण, वस्तुस्थिती अशी आहे की चिखली, कुदळवाडी या परिसरामध्ये लाखो टन प्लास्टिक, फायबर, अविघटनशील घातक पदार्थ हे जाळले जातात. इंद्रायणी नदीचे प्रदूषण केले जाते. याकडे पिंपरी महापालिका दुर्लक्ष करत आहे आणि विनाकारण गणेश उत्सवाच्या वेळेस अतिशय पर्यावरण बद्दल सहानुभूती व्यक्त करते.

Pimpri Corona Update : रुग्णसंख्येत मोठी घट! शहरात आज 12 नवीन रुग्णांची नोंद, 19 जणांना डिस्चार्ज

चिखली, कुदळवाडी, मोशी भागात पर्यावरणाची हानी होते. त्याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करते. अविघटनशील घातक पदार्थ जाळणाऱ्या विरोधात पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालय या सर्वांना निवेदन दिले. (Pimpri News) तरीदेखील त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. फक्त गणेश उत्सवांच्या वेळेसच पर्यावरणाबद्दल कळवळा व्यक्त केला जातो. हे सर्व हत्ती सोडून शेपूट धरण्याचे काम आहे. तसेच महानगरपालिका ही पर्यावरण बद्दल अतिशय संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी प्रयत्न आहे असे काही नसून यांना पर्यावरणाची कोणतीही काळजी नाही. पर्यावरण विभाग हा फक्त हप्ते वसूल करण्यासाठीच आहे, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.