Crime news : भागीदाराकडून होणाऱ्या आर्थिक व मानसिक त्रासाला कंटाळून बांधकाम व्यावसायिक महिलेची राज्य मानवी हक्क आयोगाकडे धाव

एमपीसी न्यूज : बांधकाम व्यवसायात भागीदाराने केलेली तीन कोटींची फसवणूक व त्यानंतर पैशांची मागणी केली असता घरी येऊन जीव देण्याची धमकी, (Crime news) या साऱ्या त्रासाला कंटाळून पीडित बांधकाम व्यावसायिक महिलेने संबंधीत व्यक्ती विरोधात थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे धाव घेत योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

व्यावसायिक महिलेने आयोगाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परमेश्वर(प्रमोद) नागनाथ सूर्यवंशी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली.(Crime news) जानेवारी 2022 ते जून 2022 या कालावधीत अनेकदा पैसे ट्रान्सफर करून स्वतःच्या खात्यात जमा करून घेत, तीन कोटी रुपयांची फसवणूक केली. अनेकदा पैशा संबंधीच्या कागदपत्रांची मागणी करूनही त्यांनी प्रत्येक वेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. प्रत्येक महिन्यात आपले काम होत आहे, असे भासवून रक्कम स्वतःच्या खात्यात जमा करवून घेतली. जून 2022 नंतर पिडीत व्यावसायिक महिलेकडे असणारे सोने, गाडी तारण ठेवून पैसे घेतले. मात्र परतावा म्हणून आजपर्यंत प्रमोद यांच्याकडून 500 रुपये सुद्धा परत मिळालेले नाहीत.

Pimpri News : महापालिकेची पर्यावरणाबाबतची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच – दिगंबर काशिद

तारण ठेवलेले दागिने व वस्तू सगळे सोडवून आणण्याची मागणी केली असता पैसे आले की सोडवू, अशी उत्तरे देण्यात आली. किमान पैसे तरी द्या, असे म्हटल्यानंतर तुमच्या घरी येऊन सासु-सासरे, नवरा यांच्या समोर फाशी घेतो आणि तुम्हा सर्वांना अडकवतो असे व्हॉटसअप मेसेज करून धमकावण्यात येत आहे, असा आरोप व्यावसायिक महिलेने केला आहे.

या साऱ्या आर्थिक व्यवहारात संबंधीत व्यावसायिक महिलेचे बँक खाते स्थावर मालमत्ता, सोन्या चांदीच्या वस्तू सगळेच पणाला लागले आहे. त्यांचे राहते घर सोडावे लागले. (Crime news) तसेच ज्यांच्याकडून उसने पैसे घतले होते ते आता पैशासाठी मागे लागले असून संपूर्ण कुंटुंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहे. तरी संबंधीत व्यावसायिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना सूचना द्याव्यात, अशी मागणी संबंधीत व्यावसायिक महिलेने निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.