PCMC News: भंगारातून महापालिकेला साडेपाच कोटींचे उत्पन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील (PCMC News) भंगार साहित्याचा लिलाव करण्यात आला. मध्यवर्ती भांडार विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या ई लिलावामध्ये 48 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये 18 ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करण्यात आला असून महापालिकेला साडेपाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती भांडार विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.

महापालिकेच्या विविध विभागातील निरुपयोगी व भंगार साहित्याचा लिलाव केला जातो. यावर्षी पर्यावरण, वायसीएम रुग्णालय, मोशी कचरा डेपो, सेक्‍टर 23 या ठिकाणच्या भंगाराचा लिलाव करण्यात आला. 18 ठिकाणी असलेल्या सर्व भंगाराचे 3 कोटी 80 लाख 82 हजार रुपये मध्यवर्ती भांडार विभागाने जाहीर केले होते. त्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ई लिलावामध्ये 48 जणांनी सहभाग घेतला. सहभागी असलेल्या प्रत्येकाला साहित्य पाहण्यासाठी 5 दिवसांचा कालावधी दिला होता.

Talegaon Dabhade : राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम

48 पैकी तब्बल 20 जणांनी ई लिलावामध्ये सर्व लॉटची 5 टक्के रक्कम बयाणा म्हणून भरली होती. त्यानंतर भंगार साहित्याची बोली लावण्यात आली. त्यामध्ये सर्व 18 ठिकाणच्या भंगार साहित्याचे 5 कोटी 46 लाख 16 हजार रुपये उत्पन्न मिळाले. जाहीर केलेल्या किंमतीपेक्षा तब्बल 1 कोटी 63 लाख 33 हजार रुपये महापालिका (PCMC News) प्रशासनाला जास्तीचे मिळाले असल्याचे उपायुक्त लोणकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.