Pimpri News : फोटोग्राफर फाउंडेशन तर्फे ज्येष्ठ फोटोग्राफरचा सन्मान

एमपीसी न्यूज – फोटोग्राफर फाउंडेशन ऑफ पिंपरी चिंचवड (Pimpri News) तर्फे आज (शनिवारी) शहरातील दहा ज्येष्ठ फोटोग्राफर यांचा सन्मानपत्र तुळशी रोप आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पासलकर आणि उपाध्यक्ष हेमंत मिश्रा यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आले.

यावेळी अनिल जैन, फ्रान्सिस फर्नांडिस, व्ही. एन. विवेकानंद, सत्येन भास्कर, अरुण कदम, बलविंदर सिंग भट्टी, नितीन जोशी, कुमार गायकवाड, जगदीश भागतानि, भानुदास हिवराळे यांचा सन्मान करण्यात आला. फाउंडेशनचे सेक्रेटरी प्रमोद भोसे, खजिनदार संन्याल शिंदे, राजेश पवार, संदीप धुमाळ, विनोद कदम, प्रमोद झवेरी उपस्थित होते.

PCMC News: भंगारातून महापालिकेला साडेपाच कोटींचे उत्पन्न

चिंचवड येथील सिद्धिविनायक हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात एस.आर. के. लॅब तर्फे फोटो ग्रंथ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा डेमो कार्यक्रम घेण्यात आला, त्याची माहिती श्री लॅबचे मालक शहा यांनी दिली. फुजी फिल्म तर्फे नवीन कॅमेराचा डेमो देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत मिश्रा यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.