PCMC News : सर्व रुग्णालयात बालकांसाठी ‘एनआयसीयू’ सुरु करा; आपची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयात बालकांना नवजात बालकाचे(NICU) अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या मागणीसाठी (PCMC News) आम आदमी पार्टीने आज (शुक्रवारी) आंदोलन केले. त्यानंतर शहरातील पाच रुग्णालयामध्ये एनआयसीयू युनिट तातडीने सुरू करण्याचे आश्वासन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिले.

महापालिकेच्या  विविध रुग्णालयात लोकसंख्येच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या आहेत. रुग्णालयात बाळंतपण विनामूल्य असल्याने अनेक गरजू,गरीब व श्रमिक रुग्णालयाकडे (PCMC News) नागरिकांचा लोंढा जास्त आहे. त्यामुळे येथील मुख्य रुग्णालयात प्रसूतिगृहामध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावेत, अशा मागणीचे निवेदन आयुक्त शेखर सिंह यांना दिले.

Gharkul scheme : घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यास 18 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच प्रसुतीपश्चात बाळाला योग्य सुविधा मिळण्यासाठी नवजात शिशु अतिदक्षता विभागात हायटेक सुविधा मिळाल्या पाहिजेत.(PCMC News) प्रसूतिगृहमधील बाळंतणानंतरची कमी वजनाची किंवा अत्यवस्थ बालके वायसीएममध्ये पाठवली जातात. तेथे पुरेसे एनआयसीयू नसल्याने डॉक्टर खाजगी रुग्णालयात बाळाला पाठवण्याचा सल्ला देतात.खाजगी आय सी यु ची अफाट बिले गरीब रुग्ण भरू शकत नाही,ती बिले मनपाने भरावीत,अशी मागणी आपने केली.

चेतन बेंद्रे,राज चाकणे,यलप्पा वालदोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांमध्ये डॉ.योगेश बाफना, डॉ. संतोष गायकवाड,डॉ. जाधव, ज्योती शिंदे, ब्रम्हानद जाधव, (PCMC News) यशवंत कांबळे, मंगेश आंबेकर, स्वप्निल जेवळे,सरोज कदम,नाजनीन मेनन,शिवम यादव,सुरेश भिसे,गोविंद माळी,आशुतोष शेळके,सायली केदारी,कल्याणी राऊत,मीनाताई जावळे,मैमुना शेख, पूनम गीते, बाजीराव बाणखेले, सुरेंद्र कांबळे, मोतीराम अगरवाल, महेश गायकवाड, चंद्रमणी जावळे, अशोक नांगरे, महेश गायकवाड, adv महेंद्रकुमार गायकवाड, संजय मोरे, संतोष बागाव इ नी भाग घेतला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.