PCMC : स्वच्छता मोहिमेमध्ये रिक्षाचालकांचाही सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)  स्वच्छता मोहिमेमध्ये रिक्षाचालक देखील सहभागी होणार असून शहरात कोठेही कचरा टाकताना एखादी व्यक्ती रिक्षाचालकांना आढळल्यास त्या व्यक्तीस कचरा टाकल्यापासून प्रतिबंध करण्यात येईल अशी माहिती पिंपरी-चिंचवड रिक्षा संघटनांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने स्वच्छता लीग 2.0 च्या अनुषंगाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. महापालिकेच्या वतीने या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले होते. आज महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महात्मा गांधी यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. तसेच शहरात स्वच्छता प्रचारार्थ भव्य रिक्षा रॅलीही काढण्यात आली होती.

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शगुन चौक, रिव्हर रोड, भाटनगर मार्गे,चिंचवड मोरया हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन,पिंपरी असा रॅलीचा मार्ग होता.

आयुक्त शेखर सिंह यांनी रॅलीचे उद्घाटन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप,सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.

Pune : अंहिसा दिनी दंगलमुक्त पुण्यासाठी आयोजित शांती मार्चला प्रतिसाद

भारतीय स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 75 रिक्शा या रॅलीत समाविष्ट केल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया,आठवले (PCMC) गट, महाराष्ट्र, रिक्षा वाहतूक आघाडीचे अजिज शेख यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी रिक्षाचालक संघटनांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल अजिज शेख आणि “बघतोय रिक्षावाला फोरमचे” अध्यक्ष संतोष उबाळे यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.