Sharad Pawar : आदिवासींना वनवासी म्हणण्याचा संबंध काय? जातनिहाय जनगनणा करावी

एमपीसी न्यूज – आदिवासींना आदिवासी न म्हणता वनवासी (Sharad Pawar) म्हटले जाते. पण, वनवासी म्हणण्याचा काय संबंध? आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना आदिवासी न म्हणता तुम्ही वनवासी आहात. तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. ती मूळीच मान्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. तसेच जातनिहाय जनगनणा करावी अशी मागणीही त्यांनी केली.

भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाच्या वतीने आज (सोमवारी) दापोडीत सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या हस्ते शरद पवार यांना मानपत्र अर्पण करण्यात आले.

तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणा-यांचा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठान संघाचे अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव, कार्याध्यक्ष भारत जाधव, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, अरुण बो-हाडे, सुलक्षणा धर, काशिनाथ नखाते, श्रीकांत पाटील आदी होते.

कोणता समाज किती टक्के याची माहिती मिळण्याकरिता जातनिहाय (Sharad Pawar) जनगणना झालीच पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे. जातनिहाय जनगणनेची माहिती पुढे ठेवल्यानंतर जो समाज सगळ्यात दुबळा आहे.

त्याच्यासाठी शक्ती वापरण्याची आवश्यकता असल्याचे सांगत पवार म्हणाले, आमचा सन्मान करण्याचा आजचा काळ नाही. भटक्या विमुक्तांना सन्मानाने जगण्याची संधी कशी मिळेल, याचा विचार करुन त्यासाठी खबरदारी घ्यायची, पावले टाकायची यासाठी काम करण्याचा काळ आहे.

भटक्या विमुक्तांचे प्रश्न अनेक आहेत. आजचे राजकर्ते या प्रश्नांबाबत किती जाणकार आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याची भावना त्यांच्यामध्ये कितपत आहे, असा सवाल त्यांनी केला.

राजीव गांधी यांच्या काळात अनुकूल कायदे

आदिवासींसाठी राजीव गांधी यांच्या काळात अनुकूल कायदे केले. आमच्याकडे सत्ता असताना आदिवासी, भटक्या विमुक्तांना सवलती दिल्या. परंतु, आजही फार मोठा वर्ग एका वेगळ्या स्थितीत राहत आहे. त्यातून त्यांन बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण, त्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकत बदलली पाहिजे.

यापुढे आदिवासी, भटके विमुक्त गप्प बसणार नाही

रविवारी जुन्नरमध्ये आदिवासी एकत्रित आले होते. आमचे चुकले काय, राज्यकर्त्यांच्या आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आदिवासी न म्हणता वनवासी म्हणत आहेत.

वनवासी म्हणण्याचा काय संबंध आहे. आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना आदिवासी न म्हणता तुम्ही वनवासी आहात. तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते.

ती मूळीच मान्य नाही. हे चित्र काल आदिवसी तरुणांनी शिवसेनेरीच्या पायथ्याशी माझ्यापुढे मांडले. याचा अर्थ आदिवासी, भटके विमुक्त हा वर्ग आता जागा झाला आहे. यापुढे गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

Chikhali : पूर्व वैमानस्यातून एकाचे अपहरण आणि खून

राज्यकर्त्यांना सामूहिक शक्तीचे चित्र दाखविण्याची आवश्यकता

राजकारणात काही मिळेल अथवा नाही मिळेल याचा विचार (Sharad Pawar)करण्याची आजची वेळ नाही. पण, हा उपेक्षित, संघटित वर्गाची सामूहिक शक्ती मजबूत ठेवणे आणि जे या वर्गाला एका दृष्टीने उध्वस्त करण्याचा प्रयत्न आपल्या धोरणातून करतात.

त्यांच्याविरुद्ध लढणे, सामूहिक शक्तीचे चित्र दाखविणे हा कार्यक्रम सर्वांना घ्यावा लागणार असे आवाहनही पवार यांनी केले.

मागण्या पूर्ण करण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे – बाबा आढाव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव म्हणाले, भटके विमुक्त समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आता देशाला इंडिया की भारत म्हणायचे यावरून चर्चा केली जात आहे.

पण, या चर्चेतून बेरोजगारी, महागाई, दुष्काळ या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राजकारणात भटकणा-यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे.

सकाळी वेगळ्या आणि संध्याकाळी वेगळ्या राजकीय पक्षात जातात. कारण, त्यांना सत्ता, मानपान हवा आहे. आज नथुराम गोडसेचे उद्दातीकरण केले जाते. गोडसेचे कितीही नाव घ्यावे, पण जग महात्मा गांधी यांचे नाव घेते त्याचे काय करणार आहात?

शरद पवार आपल्यासाठी उभे आहेत

शरद पवार यांना आता काय पाहिजे नाही. ते आपल्यासाठी उभे आहेत. संघर्षाच्या काळात भटके विमुक्त समाजातील लोकांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहून सन्मान केला. हे शहाणपण आहे. सध्याचा काळ कठीण आहे.

निवडणुकांसाठी काय पण चालले आहे. एक रेल्वेचा अपघात घडलामुळे लालबहादूर शास्त्री राजीनामा देऊन सत्तेबाहेर पडले होते. आज अपघात झाला की मदत जाहीर करून मोकळे होतात. पण, राजीनामा कोण देत नाही.

लोकशाहीत एक माणूस तालेवार बनून चालत नाही. समाजातील शेवटचा घटक तालेवार झाला पाहिजे. लोकशाहीसाठी लढत रहावे, असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.