Pune : अंहिसा दिनी दंगलमुक्त पुण्यासाठी आयोजित शांती मार्चला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिनानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (Pune) आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शांती मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला. गांधी भवन कोथरुड ते फर्ग्युसन कॉलेज येथील गोखले पुतळ्या पर्यंत हा शांती मोर्चा काढण्यात आला.

युक्रांद,नवभारत ज्ञानवर्धीनी, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय, माहेर संस्था,अभिनव संस्था आदी संस्थांचे पदाधिकारी,विद्यार्थी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संदीप बर्वे आणि अन्वर राजन यांनी संबोधित केले. सुरूवातीला नीलम पंडीत यांनी संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले.

Chinchwad : खून केल्यानंतर आरोपी रोहित मुंबईला जाऊन बनला ‘गायत्री’

आनंद ऋषी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी व प्राचार्य कुलकर्णी, तसेच इंटेलेक्चुअल संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुखही मोर्चात (Pune) सहभागी झाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘दंगल घडू नये यासाठी अशा प्रकारच्या शांती मोर्चा आणि शांती विचारांची आज देशाला आणि आजच्या युवा पिढीला गरज आहे.

मी हिंसा करणार नाही आणि जिथे दंगा होत असेल तो शांततापूर्ण मार्गाने थांबविण्यासाठी प्रयत्न करेन अशी तरूणांनी शपथ घेणे आवश्यक आहे’, असेही मत सप्तर्षी यांनी व्यक्त केले. आजच्या या शांती मार्च मध्ये तरूणांचा लक्षणीय सहभाग होता.’राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय’, ‘एक रुपया चांदीका, सारा देश गांधी का’, ‘दंगल मुक्त महाराष्ट्र, दंगल मुक्त भारत’, ‘संविधानाचा विजय असो’, ‘नफरत छोडो, भारत जोडो’ अशा घोषणा देत हा शांती मार्च काढण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.