Chinchwad : खून केल्यानंतर आरोपी रोहित मुंबईला जाऊन बनला ‘गायत्री’

एमपीसी न्यूज – कर्ज झाल्याने ते फेडण्यासाठी एका तरुणाचे अपहरण(Chinchwad)करून त्याचा खून केला. या खुनाच्या प्रकरणातून वाचण्यासाठी आरोपी मुंबईला गेला आणि किन्नर बनला. त्याने त्याची ओळख बदलून रोहित हे नाव बदलून गायत्री असे नाव ठेवले. मात्र पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गायत्री हीच रोहित असून त्याने खून केल्याचे निष्पन्न केले.

सचिन हरिराम यादव (वय 19, रा. कुरुळी, ता .खेड) हा तरुण 24 ऑगस्ट रोजी घरातून कामानिमित्त गेला(Chinchwad)तो परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिनच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे गुन्हे शाखा युनिट एकला आदेश दिले.

Chinchwad : रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाहिली आदरांजली

त्यानुसार पोलिसांनी सचिन यादव ज्या मार्गाने गेला तिथले सीसीटीव्ही तपासले. तांत्रिक माहिती (Chinchwad)काढून तो खेड एमआयडीसी येथे दोन अनोळखी व्यक्तींसोबत गेल्याचे निष्पन्न केले. त्यातील एकजण गोरख जनार्दन फल्ले (वय 32, रा. कानडी रोड, केज, बीड) हा सचिन याच्या चाळीत भाड्याने राहत होता. सध्या तो बीड जिल्ह्यातील केज येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोरख याला केज मधून ताब्यात घेतले.

 

त्याच्याकडे चौकशी केली असता गोरख याने त्याचा मामेभाऊ रोहित नागवसे याच्यासोबत मिळून सचिन यादव याला निमगाव परिसरात देवदर्शनासाठी नेले. तिथे जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर रोहित याला किन्नर बनण्यासाठी मुंबई येथे एका किन्नरकडे पाठवले असल्याचेही गोरख याने सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई परिसरातील विरार येथे रोहित हा किन्नर बनून राहत असल्याची माहिती मिळवली.

त्यानुसार पोलिसांनी विरार मधील एका किन्नरच्या घरात जाऊन पाहणी केली असता तिथे एक किन्नर आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गायत्री असे सांगितले. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली आणि गायत्री हीच रोहित शिवाजी नागवसे (वय 22, रा. जवळबंद, ता. केज. जि. बीड) असल्याचे निष्पन्न केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपण हा बनाव केल्याचे रोहितने तपासात सांगितले. रोहित आणि गोरख दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यासाठी त्यांनी यादव कुटुंबाला लुटण्याचा कट रचला. त्यातूनच सचिन यादव याचा खून केल्याचे समोर आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.