Chinchwad : रक्तदान शिबिराचे आयोजन करून वाहिली आदरांजली

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते स्वानंद राजपाठक (Chinchwad) यांचे वडील विजयकुमार राजपाठक यांच्या दशक्रिया विधी निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  

कै. विजयकुमार राजपाठक हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळात नोकरीस होते. तेथे त्यांनी इंटकच्या माध्यमातून वीज मंडळातील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने केली आहेत. निवृत्तीनंतर संघटनेच्या माध्यमातून निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कार्यरत राहिले. त्यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

Sharad Pawar : आदिवासींना वनवासी म्हणण्याचा संबंध काय? जातनिहाय जनगनणा करावी

रक्तदान शिबिरास आनंद ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलच्या (Chinchwad)  रक्तपेढीच्या माध्यमातून 1 आक्टोबर रोजी हे रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी यशवंतराव चव्हाण रक्तपेढीचे डॉ. शंकर मोसलगी,  ब्लड बँकेचे सुनित आवाटे, डॉ राज शिनकर, ज्ञानेश्वर खेडकर, रवींद्र कुलकर्णी, माधव जोशी, नरसिंह पाडुळकर, प्रिया जोशी, अशोक नागणे, दिलीप पाटणकर, रवींद्र झेंडे, श्याम ब्रह्मे, प्रदीप वळसनकर, पंकज देशमुख, मयुरेश जोशी,  पुनम गुजर, शशिकांत पानट आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.