PCMC : 8 केंद्रांवर इन्कोव्हॅकचे लसीकरण

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या 8 लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधक इन्कोव्हॅक लसीचा प्रिकॉशन ( PCMC) डोस दिला जाणार आहे. 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर आणि हेल्थकेअर वर्कर यांना हे लसीकरण केले जाईल. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या दुसर्‍या डोसनंतर सहा महिन्यांचा किंवा 26 आठवड्यांचा कालावधी त्यासाठी पूर्ण होणे गरजेचे आहे.

Pune : गणेशोत्सव काळात पुण्यात सात हजार पोलीस व 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर

केंद्रांवर येणार्‍या नागरिकांची कोविड अ‍ॅपवर नोंदणी करून नाकावाटे त्यांना हे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर त्यासाठी प्रत्येकी 20 लस पुरविण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 4. 30 या वेळेत हे लसीकरण होईल. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर या कालावधीसाठी हा लसीकरण कार्यक्रम निश्चित केलेला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर 19, 22 आणि 28 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुटी असल्यामुळे त्या दिवशी हे केंद्र बंद राहतील. त्याशिवाय, दर रविवारी लसीकरण कामकाजाची  साप्ताहिक सुटी करण्यासाठी केंद्र बंद ठेवण्यात येणार ( PCMC ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.