Pune : गणेशोत्सव काळात पुण्यात सात हजार पोलीस व 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर

एमपीसी न्यूज – गणपती अवघ्या दोन दिवसांवर आले असून (Pune) नागरिकांची जशी उत्सवासाठी लगबग सुरु आहे. तशी पोलिसांची देखील या गणेशोत्सवासाठी तयारी सुरु आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त तर 1 हजार 800 सीसीटीव्हीची करडी नजर  राहणार आहे.

उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडक बंदोबस्त राहणार आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक दर्शनासाठी येतात. परदेशी नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात. भाविकांकडील मोबाइल चोरी, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केले जाणार आहेत.

Talegaon Dabhade : हिंदी भाषेला विदेशातही भविष्य

पोलीस आयुक्तालयातील पाच हजार पोलीस कर्मचारी, अधिकारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले एक हजार 300 पोलीस कर्मचारी, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच तुकड्या बंदोबस्तात राहणार आहे. बंदोबस्तास पोलीस मित्र सहाय्य करणार आहेत.

उत्सवाच्या कालावधीत मानाच्या मंडळासह गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलीस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चार वेळा तपासणी करणार आहेत. उत्सवी गर्दीवर शहरात 1 हजार 800 सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहे.

पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. देशभरात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुणे पाेलिसांनी कोथरुड परिसरातून अटक केली. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवाया विचारात घेऊन पोलिसांकडून उत्सवाच्या काळात कडक (Pune) बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.