Talegaon Dabhade : हिंदी भाषेला विदेशातही भविष्य

इंद्रायणी महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस उत्साहात (Talegaon Dabhade) साजरा झाला. हिंदीच्या बहुमुखी लेखिका, नाटककार जया सरकार आणि संध्या गोयल यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या बहुमुखी उपयोग आणि महत्त्वाबाबत माहिती दिली. हिंदी भाषा जगातील अनेक देशांमध्ये बोलली जाते. हिंदी भाषेला विदेशात देखील चांगले भविष्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे,उपप्राचार्य प्रा संदीप भोसले, हिंदी विभाग प्रमुख डॉ मधुकर देशमुख, हिंदी विषयाचे प्रा राजेंद्र आठवले,अर्चना पाटील,डॉ सत्यम सानप, मिलिंद खांदवे, डाॅ प्रमोद बोराडे, सत्यजित खांडगे,डॉ संदीप कांबळे, प्रा छाया काशीद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
जया सरकार म्हणाल्या, आपल्या बोलण्यातून म्हटले की हिंदी भाषा फक्त भारतातच नव्हे तर विदेशामध्ये ही वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उपयोगात आणली जाते. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आणि राजभाषेचा सन्मान केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. माझी मातृभाषा हिंदी आहे आणि मी हिंदी भाषेवरती प्रेम करते.
मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, माझी हिंदी ही उच्च कोटीची नाही. यामध्ये अनेक भाषांच्या शब्दांचा प्रयोग करून आम्ही हिंदी बोलतो . परंतु काही विद्वान फक्त हिंदी भाषेचाच प्रयोग करतात. मी परदेशात जाण्यासाठी मला इंग्रजी शिकणे आवश्यक होते परंतु मला इंग्रजी भाषा अतिशय (Talegaon Dabhade) कठीण जात होती. आज मी हिंदी बरोबर उत्कृष्ट इंग्रजी बोलू शकते. दुबईमध्ये 63 टक्के जनता ही हिंदू असल्यामुळे आम्ही हिंदीमध्ये जास्त बोलतो.

दुस-या व्याख्याता संध्या गोयल ह्या बिटिया नामक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या प्रमुख आहेत. त्यांनी असे सांगितले की, मी भारतीय असूनही अमेरिकेमध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. अमेरिकेतील लोक ही हिंदीचा खूप सन्मान करतात असे त्यांनी सांगितले.त्यांनी पुढे सांगितले की जे पण भारतीय अमेरिकेमध्ये आहेत ते आपल्या मुलांना इंग्रजी बरोबर हिंदी भाषेचेही  (Talegaon Dabhade)  ज्ञान देतात. मी अमेरिकेमध्ये 35 वर्षे राहूनही भारतीय संस्कृती आणि हिंदी भाषेला विसरली नाही .
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी सांगितले की , सर्व विद्यार्थ्यांनी आपापसात बोलत असताना हिंदी भाषेचा प्रयोग करावा. हिंदी अतिशय सोपी आणि सरळ भाषा आहे असे सांगत त्यांनी  सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ मधुकर देशमुख यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की , आपण राजभाषा आणि राष्ट्रभाषा यामध्ये न अडकता हिंदी भाषा कशी सक्षम झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर हिंदी मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देशातच नव्हे तर परदेशातही नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असे त्यांनी सांगितले.
प्रा राजेंद्र आठवले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व  प्रा अर्चना पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे ,कार्यवाह चंद्रकांत शेटे ,खजिनदार शैलेश शहा व सर्व विश्वस्तांनी कार्यक्रमाला व हिंदी दिवसाला हार्दिक (Talegaon Dabhade)  शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.