Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू. हा अपघात रविवारी (दि.4) मुंबई-बँगलोर महामार्गावर घडला आहे.

Iti : आयटीआय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींचे घवघवीत यश

पुष्पपाल मारुती शेलार (वय 50 रा.यमुनानगर) यांनी देहुरोड (Dehuroad)  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर संतोष मारूती शेलार यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ संतोष मारुती शेलार हे पायी रस्ता ओलांडत असताना  आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे चालवून संतोष यांना जोरदार धडक दिली. तसेच तो तेथे न थांबता तेथून निघून गेला. यामध्ये संतोष यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देहुरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.