Bhosri : खोट्या वेब पेजद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेला खोट्या वेब पेजद्वारे टास्क देत महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 3 फेब्रुवारी ते 9 मार्च 2023 या कालावधीत घडला आहे.

Dehuroad : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

यावरून महिलेने भोसरी (Bhosri) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्ह़ॉटसअप क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी व्हॉटसअप क्रमांकावरून http://amazon phil.com/h5#/ या फसव्या पेजवरून टास्क देत ते पूर्ण केल्यास आकर्षक पैसे देण्याचा विश्वास दिला. तसेच त्यांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मात्र आरोपीने फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची 5 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.भोसरी (Bhosri) पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.