Pimpri : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहरूनगर येथे सराईत गुन्हेगाराचा खून झाला. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियमजवळ उघडकीस आली.

Bhosri : खोट्या वेब पेजद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूक

बल्लू उर्फ आदर्श ठाकूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ अज्ञातांनी ठाकूर याला लाकडी दांडक्याने मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ठाकूर याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो पिंपरी ( Pimpri) चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.