Iti : आयटीआय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Iti ) आय.टी.आय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींनी 12 वी समकक्षेतेसाठी आवश्यक असणाऱ्या राज्य मंडळाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळविले आहे.

कौशल्य विकास विभागाच्या प्रस्तावानुसार शालेय शिक्षण विभागाने आय.टी.आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना 10 वी व 12 वी ची समकक्षता देण्याबाबतच्या धोरणांचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याच अनुषंगाने प्राचार्य शशिकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून संस्थेने राज्य मंडळाचा संस्था संकेतांक मिळविला. तसेच प्रशिक्षणार्थ्यांना याबाबत वेळोवेळी अवगत करून त्यांचे समुपदेश व मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केले.

प्रशिक्षणार्थ्यांचे सदर परीक्षेचे फॉर्म भरणे, त्यांचे फॉर्म राज्य मंडळाच्या कार्यालयात जमा करणे, प्रशिक्षणार्थींना अभ्यासक्रमाबाबत अवगत करून देणे, याबाबतचे कामकाज संस्थेचे निदेशक काळोखे, रेंगडे व लिपिक चावरिया यांनी पाहिले. प्रशिक्षणार्थ्यांची श्रेणी विषयाचे अभ्यास पूर्ण करून घेऊन मूल्यमापन करणेकामी नेहरूनगर शाळेच्या प्राचार्य पवार यांनी विशेष सहकार्य केले. या कामी वेळोवेळी राज्य मंडळाच्या श्रीमती.साबळे यांनी मार्गदर्शन केले.

त्यांची फलश्रुती म्हणून परीक्षेकरीता बसलेल्या 25 पैकी 24 माजी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 96 टक्के निकाल अन्वये प्रशिक्षणार्थी 12 वी समकक्षतेचे प्रमाणपत्र मिळवून पुढील उच्च (Iti) शिक्षण घेण्यास सज्ज झाले आहेत. यावेळी प्राचार्य पवार म्हणाले, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कुशल मनुष्यबळांच्या नेमणुकीसाठी व्यावसाय शिक्षणाबरोबर कोणत्याही एका पदवीची मागणी करत असतात. शासन निर्णयाची संस्थेने केलेल्या अंमलबजावणीमुळे प्रशिक्षणार्थ्यांच्या पुढील पदवी शिक्षणाचा मार्ग आता मोकळा झालेला असून उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींनी पुढील शिक्षण पूर्ण करून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

Nigdi : रात्र गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण

तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणांनुसार व कंपन्यांच्या बदलत्या गरजांनुसार संस्था बीव्होक सारख्या व्यवसायिक पदवी मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे प्राचार्य पवार यांनी आवर्जून नमूद केले. आय.टी.आय उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा 11 वी – 12 वी नियमित किंवा बहि:स्थ पद्धतीने करण्याचा विचार चालू होता. पालकही याबाबत आग्रही होते, परंतु या समकक्षतेमुळे 2 शैक्षणिक वर्षाचे वेळेचे नुकसान टळले त्याचबरोबर शिक्षणात येणारी संभाव्य कुंठितता तथा दूर झाली आहे अशी भावना प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.