Pimpri : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची 25 वी बैठक संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची 25 वी बैठक स्मार्ट सिटी कार्यालय, ऑटो क्लस्टर येथे शुक्रवार (Pimpri) रोजी पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, स्वतंत्र्य संचालक यशवंत भावे (ऑनलाईन), प्रदीप भार्गव, पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त विनय चौबे, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते, शहर अभियंता मकरंद निकम, सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, व्यवस्थापक (इन्फ्रा.) मनोज सेठिया, मुख्य वित्तीय अधिकारी सुनील भोसले, कंपनी सेक्रेटरी चित्रा पवार, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे आदी उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये, पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापकी संचालक संजय कोलते यांची नामनिर्देशित संचालक म्हणून निवड करण्याच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली. लेखापरीक्षण समितीच्या शिफारशीनुसार 1 एप्रिल, 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीतील अर्धवार्षिक वित्तीय विवरण पत्र यावर चर्चा झाली. 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी अंतर्गत लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद यावेळी घेण्यात आली.

Pune : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

भारत सरकारचे स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) मार्फत 12 व 13 जानेवारी 2024 या कालावधीत पिंपरी चिंचवड येथे “स्ट्रीटस ऍन्ड पब्लीक स्पेसेस” या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन तसेच खर्चाबाबत चर्चा करून या कार्यशाळेच्या नियोजन/कामकाजासंबंधी निर्णय घेण्यात आला. तसेच, आयसीसीसीच्या “ऑपरेशनल मॅन्युअल आणि व्यवसाय योजना” मसूद्यास मंजुरी देण्यात आली. “जीआयएस सक्षम इआरपी” प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेल्या आयटी सॉफ्टवेअरसह तृतीय पक्ष एकीकरणासाठी करार करून प्रकल्पाच्या धोरणात्मक निर्णयासाठी स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी (Pimpri) अधिकारी आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांना अधिकारी प्रदान करण्यात आले.

यासह पादचारी मार्ग, सायकल मार्ग, युटिलिटी कंड्युट्स/डक्ट, स्टॉर्म, वॉटर ड्रेन, रोड मार्किंग, स्ट्रीट लाईट, स्ट्रीट फर्निचर, ट्रॅफिक यांचा समावेश असलेल्या एबीडी परिसरात स्मार्ट रोडच्या बांधकामासाठी प्रकल्पाच्या कालमर्यादा वाढविण्याबाबत चर्चा झाली. पिंपरी चिंचवड येथे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत साइनेज, स्ट्रीट लँडस्केपिंग कामे, जंक्शन सुधारणा, स्मार्ट टॉयलेट आणि इतर विविध कामे आणि दोन उद्यानांचा पुनर्विकास यासाठी 3 महिने मुदतवाढ देण्यात आली. तसेच, पिंपरी चिंचवडमध्ये 15 वर्षांच्या कालावधीसाठी पीपीपी तत्वावर स्मार्ट सिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत सूरू असलेल्या स्मार्ट टॉयलेट “सार्वजनिक शौचालयाचे विकास कार्य, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठी 31 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

“ओएफसी सिटी नेटवर्क अंतर्गत गॅन्ट्री आणि वायफाय पोल उभारण्यासाठी” प्रकल्पाच्या टाइमलाइन विस्तारावर चर्चा करून 4 महिने कालावधीसाठी (Pimpri) मुदत देण्यात आली. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कार्यरत असलेले इन्क्युबेशन सेंटर हे ऑटो क्लस्टरकडे वर्ग करण्याबाबतचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासह विविध विषयांवर चर्चा करून मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या आजपर्यंतच्या भौतिक व आर्थिक प्रगतीची माहिती दिली. कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.