Talegaon Dabhade : तळेगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील काकासाहेब खळदे मार्गालगत (Talegaon Dabhade)मंत्रा सिटी समोर कष्टकरी राजा फार्मर्स मार्केट तर्फे शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन गुरुवारी (दि.21)आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून हा बाजार सुरु करण्यात आला आहे.

Pune : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

याप्रसंगी कृषी तज्ञ नवनाथ गरुड, विनोद टकले,(Talegaon Dabhade)नितीन फाकटकर,महेश बेंजामिन,विनय सरोदे,संदीप खळदे, अमर खळदे,संगीता खळदे,सायली खळदे,स्नेहा खळदे,भूषण खळदे, सुभाष खळदे,निलेश खळदे,अभय देवकर,पांडुरंग करंडे,लक्ष्मीकांत कुलकर्णी,गोकुळ किरवे,विलास पिचडसह शेतकरी, काकासाहेब खळदे नगर मधील सर्व सदस्य व नागरिक उपस्थित होते.

तळेगावची वाढती लोकसंख्या व तिला आवश्यक असणाऱ्या भाजी पाल्याची सुविधा सर्वांना मिळावी म्हणून युवा कार्यकर्ते संकेत खळदे यांच्या संकल्पनेतून या आठवडे बाजाराची सुरुवात करण्यात आली आहे. कष्टकरी राजा ॲग्रो फार्मर प्रोडक्शन कंपनी लिमिटेड कडून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी विभाग पुरस्कृत शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून ही सुविधा दर गुरुवारी सायंकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

या आठवडे बाजारामध्ये आलेला माल हा सेंद्रिय खताचा वापर करून तयार केलेला असेल असे कृषी तज्ञ नवनाथ गरुड यांनी सांगितले. तसेच या कष्टकरी राजा फार्मर्स मार्केटचे एकूण 570 सभासद असून या ठिकाणी 50 टेन्टची उभारणी शेतकरी स्वतः प्रत्येक गुरुवारी करणार असून यामध्ये विविध व्हरायटीचा भाजीपाला व इतरमाल ठेवण्यात येणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले असून तळेगावकरांना स्वच्छ भाजीपाला मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.