Chinchwad : उदय सामंत यांचा शनिवारी चिंचवड दौरा; शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाची आढावा बैठक

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने (Chinchwad) पिंपरी चिंचवड शहरात ऐतिहासिक शंभरावे मराठी नाट्यसंमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे. या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत शनिवारी 23 डिसेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता चिंचवड मध्ये येणार असल्याची माहिती मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

या संमेलनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते चिंचवडगाव, केशवनगर येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे होणार आहे. उदय सामंत हे याठिकाणी पाहणी करण्यासाठी दुपारी 2 वाजता भेट देणार आहेत.

Talegaon Dabhade : तळेगाव येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते शेतकरी आठवडे बाजाराचे उद्घाटन

या संमेलनानिमित्त भोईर नगर, कामगार कल्याण मैदान येथे बालनगरी मंडप उभारण्यात येणार आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे या ठिकाणी पाहणी करतील आणि त्यांच्या उपस्थितीत दुपारी येथे मंडप पूजन करण्यात येणार आहे. यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील (Chinchwad) कलावंत तसेच संमेलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या प्रतिनिधींबरोबर भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी संवाद साधून आढावा बैठक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.