Thergaon : थेरगाव येथील क्रीडांगणावरील विद्यार्थ्यांना एमपीएससी पुस्तकांचे वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगावच्या ( Thergaon) कबड्डी मैदानावर सोमवारी (दि.10) क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या व माध्यमिक विद्यालय थेरगावच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या कबड्डी खेळाडूंना एमपीएससीच्या पुस्तकांचे वाटप करत मार्गदर्शन कऱण्यात आले.

 

स्पोर्ट इंडिच्या संचालिका व व्यवस्थापिका आणि बेल राईस इंडस्ट्रीच्या कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे तसेच बन्सी आटवे यांचे सौजन्याने स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच तथा पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाहक दत्तात्रय झिंजुर्डे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब तांबे, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव बाबासाहेब राठोड, श्रीकृष्णकांत टकले, सोनाली जाधव राष्ट्रीय कबड्डी खेळाडू, संतोष बारणे, कालिदास लांडगे कुस्ती प्रशिक्षक महेश दादा स्पोर्ट्स फाउंडेशन, आयेशा मत्तिको, श्रीपाद जवळेकर, मंदार दीक्षित, मेघा खराडे अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

Pune : महाविकास आघाडीतील पक्षांनी एका विचाराने काम करावं – शरद पवार

यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात सदर खेळाडूंना त्यांच्या कंपनीमध्ये कौशल्य प्रशिक्षण ( Thergaon)
देऊन नोकरी देण्याचे आश्वासन दिले. खेळाडूंनी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन दत्तात्रेय झिंजुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान अनिल लोहार एपीआय वाकड पोलीस स्टेशन यांचे ‘”स्पोर्ट्स आणि करिअर”या विषयावरील खेळाडूंना व्यावसायिक मार्गदर्शन करणारे व्याख्यान झाले. “आपल्याकडे असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय प्रमाणपत्रांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून शासकीय नोकरीच्या रूपाने कॅश करावे!'”असा खेळाडूंना त्यांनी सल्ला दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश लिंगडे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.