Pune : महाविकास आघाडीतील पक्षांनी एका विचाराने काम करावं – शरद पवार

एमपीसी न्यूज : काही प्रश्नाबाबत वेगळी मत असली तरी महाविकास (Pune) आघाडीमध्ये जे पक्ष एकत्रित आहेत. त्या सर्वांनी एकमताने आणि एका विचाराने काम करावं अशा प्रकारची आमच्यामध्ये चर्चा झाली. काही कार्यक्रम आखण्यात आले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, अशी चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली.

आज शरद पवार पुण्यातील निवासस्थानी आले. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि तुमच्या दोघांची भेट झाली. त्यावरून अनेक चर्चा सुरू झाली, पण तुमच्यात नेमकी काय चर्चा झाली? या पत्रकारांच्या  त्या प्रश्नावर शरद पवार यांनी भूमिका मांडली.

Pune : पुण्यात चार दिवसीय ‘कला स्पंदन आर्ट फेअर’चे आयोजन; 100 हून अधिक कलाकारांचा समावेश

ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल रात्री सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

या दोन्ही नेत्यांच्या अचानक भेटीमुळे आगामी कालावधीत काही राजकीय घडामोडी (Pune) घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्या सर्व घडामोडी दरम्यान आज पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आगमन झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.