Pune : पुण्यात चार दिवसीय ‘कला स्पंदन आर्ट फेअर’चे आयोजन; 100 हून अधिक कलाकारांचा सहभाग

एमपीसी न्यूज : इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या संकल्पनेमधून (Pune) आयोजित करण्यात येणारा ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ येत्या गुरुवार दि. 13 एप्रिल ते रविवार दि. 16 एप्रिल दरम्यान एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी सकाळी 11 ते सायं 8 दरम्यान संपन्न होणार आहे. सदर आर्ट फेअर हे सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

गुरुवार 13 एप्रिल रोजी यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता आर्ट फेअरचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते अशोक कुलकर्णी तर सन्माननीय पाहुणे म्हणून आर्किटेक्ट शिरीष दासनूरकर तसेच कलाकार रामजी शर्मा व राम थोरात उपस्थित राहणार आहेत.

या आर्ट फेअरचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील 100 हून अधिक कलाकार आणि कलादालनांचा समावेश यामध्ये असणार असून 1500 हून अधिक कलाकृती पुणेकर रसिकांना पाहता येतील, अशी माहिती इंडियन आर्ट प्रमोटर्सचे संस्थापक सुदीप चक्रवर्ती यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, “कला स्पंदन आर्ट फेअरमध्ये अॅबस्ट्रक्ट पेंटिंग्ज, अल्कोहोल इंक आर्ट, ऑईल, वॉटर, अॅक्रेलिक कलर पेंटिंग्ज, मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझीन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट्स यांबरोबरच पारंपारिक कला, कलाकृतींपासून ते डिझायनर संकल्पनांपर्यंत सर्व प्रकारच्या हजारो कलाकृती पुणेकर रसिकांना पहाता येतील.”

Maval : पॉस्को कंपनी आणि रोटरी क्लब तर्फे मावळातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट

देशातील एक महत्वाचा आर्ट फेअर अशी ‘कला स्पंदन आर्ट फेअर’ची ओळख असून किफायतशीर दरात कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याबरोबरच (Pune) कला रसिकांना थेट कलाकारांशी संवाद साधत, त्यांची कला समजून घेता यावी, कलाकृती खरेदी करता यावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम सुरु केल्याचे चक्रवर्ती यांनी नमूद केले. प्रतिथयश व नवोदित कलाकार यांमध्ये संवाद व्हावा हा या आर्ट फेअरचा एक प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.