Maval : पॉस्को कंपनी आणि रोटरी क्लब तर्फे मावळातील नऊ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट

एमपीसी न्यूज : पॉस्को कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Maval) यांच्या संयुक्त प्रयत्नाने मावळातील सात शाळांना शैक्षणिक साहित्य आणि उपकरणे वाटप करण्यात आले. यामध्ये सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे, वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव, महादेवी माध्यमिक विद्यालय, इंगळूण, स्वामी समर्थ विद्यालय, बऊर, आदर्श माध्यमिक विद्यालय, तळेगाव दाभाडे, वर्क फाॅर इकवॅलिटी, तळेगाव , जिल्हा प्राथमिक विद्यालय, इंदूरी या शाळांचा समावेश आहे.

या प्रकल्पाअंतर्गत पाण्याची टाकी, कॉम्प्युटर, सॅनिटरी वेडिंग मशीन, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम , फळे व लाकडी बेंचेस देण्यात आले. त्याचा उद्घाटन कार्यक्रम 11 एप्रिल आणि 12 एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी पॉस्को कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एस एच किम, संचालक जे के सीओ, प्रोडक्शन जनरल मॅनेजर अमोल बुधकाळे, एच आर हेड नेहा वाघचौरे, एच आर विद्या व्यवहारे, रोटरी क्लब तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष अनिश होले, सदस्य महेश महाजन, भालचंद्र लेले, ऋषिकेश कुलकर्णी, राजन आमरे यांचा या उपक्रमात मोलाचा सहभाग मिळाला.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

आपल्या मनोगतात कीम सर यांनी कंपनीचे सहकार्य जास्तीत जास्त देण्याचा आम्ही (Maval) प्रयत्न करू असे मत व्यक्त केले. नेहा वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे मिळालेल्या सुविधांचा छान वापर करा व मोठे झाल्यानंतर आपल्या शाळेसाठी मदत करा असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. या प्रोजेक्टसाठी रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.