Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंती निमित्त (Talegaon Dabhade) इंद्रायणी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. विजयकुमार खंदारे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. काशिनाथ अडसूळ, डॉ. मधुकर देशमुख, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे, प्रा सत्यजित खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले. समाजसुधारणेच्या तत्त्वाशी कधीही प्रतारणा न करता महात्मा फुलेंनी अतिशय खडतर आयुष्य जगत समाजातील स्त्री व दलित यांना सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले असे मत यावेळी डॉ.बोराडे यांनी नोंदविले.

या प्रसंगी प्रा.आर.आर.डोके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डोके म्हणाले की,ज्योतिबा फुले हे अतिशय कष्टाळू व मेहेनती होते. जीवनभर त्यानी समाजसुधारणा, स्त्रीशिक्षण (Talegaon Dabhade) यास प्राधान्य देत मानवी जीवनाचा पाया सत्यावर आधारित असावा यासाठी फुले यांनी आपले आयुष्य वेचले.

Talegaon Dabhade : सरपंच गोपाळे खून प्रकरणात आरोपींवर खोटे आरोप; किशोर आवारे यांची माहिती

इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रा.डॉ.संदीप कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना. महात्मा फुलेंच्या जात निर्मुलनाच्या चळवळीचा आढावा घेतला. आपल्या लेखणीतून फुलेंनी जात व्यवस्था,पारतंत्र्य, स्त्रीशिक्षण, सार्वजनिक आरोग्य अशा महत्त्वाच्या विषयांवर केलेले लिखाण किती महत्त्वाचे होते याबद्दल मार्गदर्शन केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. अडसूळ म्हणाले की, महात्मा फुले यांच्या जीवन चरित्र हे संघर्षमय होते. त्यांना दीर्घायुष्य मिळाले नाही पण मिळालेल्या आयुष्यात त्यांनी समाजसेवा, शिक्षण आणि स्वातंत्र्य यासाठी जीवन समर्पित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सत्यजित खांडगे यांनी केले तर आभार प्रा.छाया काशिद यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.