Nigdi : रात्र गस्तीवरील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – रात्रपाळी वर असणाऱ्या गुंडा विरोधी पथकातील (Nigdi) पोलिसांना ओटास्कीम येथील टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.9) पहाटे घडला.

याप्रकरणी पोलिसांनी भरत ज्ञानोबा थोरात (वय 40), युवराज रावण कसबे (वय 57), विशाल रतीलाल सागर (वय 22), तुषार तुकाराम उदगिरे (वय 23), आप्पासाहेब अतुल कदम (वय 25), सुरज अजगर चौधरी (वय 22), अजय चंद्रकात कंट्रोलु (वय 45) यांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गंगाधर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

Chinchwad : घराचा दरवाजा उघडा ठवणे पडले महाग, घरातून दोन आयफोन चोरीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व इतर पोलीस कर्मचारी रात्र गस्तीवर असताना आरोपी यांनी बेकायदेशीरपणे सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांनाच थेट शिवीगाळ व मारहाण केली. यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्ह दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.