Chinchwad : घराचा दरवाजा उघडा ठवणे पडले महाग, घरातून दोन आयफोन चोरीला

एमपीसी न्यूज – आय फोन घेणे हे सर्वांचेच स्वप्न (Chinchwad) असते, बरेच जण अगदी पोटाला चिमटा काढून तो घेतात. पण जरासे दुर्लक्ष झाले अन तेच फोन घराच्या उघड्या दरवाज्यावाटे चोरीला गेले तर…. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी (दि.9) चिंचवड येथे घडला असून, अवघ्या 15 मिनीटात हे फोन गायब करण्यात आले आहेत.

याप्रकऱणी विनय परमानंद शिरदाळे (वय 33 रा.चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पुण्यात होणाऱ्या जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या बेडरुममध्ये ठेवलेले दोन आयफोन चोरट्याने उघड्या दरवाज्यावाटे चोरून नेले आहेत. यावरून 80 हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल केला असून चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.