​Pimpri : पिंपरी-चिंचवड शहराची ओळख करून देणारी सायकल वारी अन अनोखी फोटोग्राफी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची पूर्वीपासून औद्योगिक नगरी म्हणून ओळख आहे. ही ओळख अलीकडच्या काळात काही प्रमाणात कमी होत आहे. कारण शहरात औद्योगिक विकासासह, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पुणे शहराला ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, ‘शिक्षणाचे माहेरघर’ अशा अनेक नावांनी ओळखले जाते. तर पिंपरी-चिंचवड शहराला ‘औद्योगिक नगरी’ म्हणून नावाजले जाते. शहरात अनेक शैक्षणिक संकुले देखील गजबजली आहेत. दिमाखात चालणारी सांस्कृतिक सभागृहे ही शहराचा सांस्कृतिक विकासच सांगत आहेत. पण हा विकास किंवा नव्याने तयार होणारी शहराची ओळख कोणत्यातरी माध्यमातून जगापुढे मांडण्याची आवश्यकता असते. चिंचवड मधील दोन तरुणांनी शहराची ओळख जगापुढे मांडण्याची नवी शक्कल लढवली आहे. दररोज सकाळी सायकलिंग करून दर दिवशी शहरातील एका प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्याचा सपाटा त्यांनी महिनाभर केला आहे.

मंदार दौलत भोईर आणि निखिल विश्वास बिदनूर या दोन तरुणांनी मागील एक महिन्यापासून दररोज सकाळी सायकलवरून शहराची सफर केली आहे. नुसती सफर न करता जाईल त्या ठिकाणी सायकल सोबत त्या ठिकाणाचा फोटो काढून तो सोशल मीडियावर टाकायचा. ही ऐकण्यासाठी जरी साधारण वाटणारी बाब असली तरीही शहराला जगासमोर मांडण्याची ही अनोखी टूम आहे. #EXPLORE_PCMC_VIA_PEDAL या शीर्षकाखाली मंदारने फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यामुळे शहरवासीयांना आणि पिंपरी-चिंचवड शहराशी कोणत्या ना कोणत्या मार्गाने जोडल्या गेलेल्या असंख्य लोकांना क्षणात संपूर्ण शहराची सफर घडली.

मंदार जिम चालवतो. तो याबाबत म्हणतो की, जिममध्ये चार भिंतींच्या आतमध्ये सायकलिंग करण्याऐवजी शहरातील मोकळ्या हवेत सायकलिंग करणे शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. सायकल चालवताना दररोज एकाच मार्गावरून न जाता दररोज वेगवेगळ्या मार्गाने जायला हवे. त्यामुळे एकाच मार्गाचा प्रवास कंटाळवाणा वाटणार नाही. आपण सुरुवात केल्यास आणखी काही जण हा प्रयोग सुरु करतील आणि त्यातून सायकलिंगसाठी प्रोत्साहन मिळेल. शहरातील नावीन्यपूर्व गोष्टी स्वतः शोधून त्या इतरांसमोर मांडायला हव्यात. त्यासाठी मोठा कॅमेराच असायला हवा, असं काहीच नाही. साधारण मोबाईल फोनद्वारे सुद्धा चांगले फोटो काढता येतात.

मंदार आणि निखिल या जोडगोळीने सायकल सोबत काढलेले काही अनोखे फोटो –

संत तुकाराम महाराज पूल, रावेत
भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल, कासारवाडी
हनुमान पुतळा, आकुर्डी
देशातील दुस-या क्रमांकाचा उंच झेंडा निगडीतील भक्ती-शक्ती चौकात
चापेकर बंधू स्मारक, चिंचवड
पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयासमोरील संगीत वाद्य शिल्प
मंगलमूर्ती वाडा, चिंचवड
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन
घोरावडेश्वर डोंगर पायथा
चापेकर वाडा, चिंचवड
महेश नगर चौक, संत तुकाराम नगर, पिंपरी
के एस बी चौक, चिंचवड
पिंपरी मार्केट
ऑटो क्लस्टर, चिंचवड
मदर तेरेसा पूल, चिंचवड
पुनावळे गावातून दिसणारा संत तुकाराम महाराज पूल
महादेव मंदिर, पिंपळे सौदागर
बर्ड व्हॅली उद्यान, चिंचवड
यशवंतराव चव्हाण रोड, पिंपरी
एम्पायर इस्टेट, चिंचवड

"PCMC

"PCMC"

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

"PCMC

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.