Pimpri : पिंपरीत साकारतेय भीमसृष्टी

भिंतीशिल्पातून साकारल्या  डॉ. बाबासाहेबांच्या स्मृती

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहराचा मानबिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दृष्ये नागरिकांना भीमसृष्टीद्वारे पहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांत ही भीमसृष्टी नागरिकांना पाहण्यास उपलब्ध होणार आहे. 

सुरेख व आकर्षक पध्दतीचे म्युरल्स बनविण्याचे काम पुण्यातील कलासंस्कार आर्ट स्टुडिओला देण्यात आले आहे. त्यातील 4 म्युरल्स ब्रांझमध्ये (धातू) घडविण्यात  आले आहेत. तर 12 म्युरल्सचे डिझाईन तयार करुन ते मातीमध्ये घडविण्यात आले आहेत. त्यानंतर त्याचा साचा बनवून  ब्रांझमध्ये ते तयार केले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र नागरिकांना अनुभवता यावे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने  भीमसृष्टी हा  प्रकल्प उभा राहत आहे. या संकल्पनेत आमदार गौतम चाबुकस्वार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. बाबासाहेबांच्या जीवनांतील प्रसंग व भगवान बुध्द यांच्या ध्यानमुद्रा कशा असाव्यात त्याची मांडणी कशी असावी याबाबतचे मार्गदर्शन आमदार गौतम चाबुकस्वार यांनी केली आहे.

डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनांतील 19 विविध प्रसंगाचे भिंतीशिल्प लावण्यात येणार आहे. पुतळ्याच्या दर्शनी भागात 4 व इतर भागात 15 भिंतीशिल्पाची रचना आहे. या चार भिंतीशिल्पाचा आकार 16.5 बाय 11.5 फुट आणि उर्वरित शिल्पाचा आकार 12 बाय 7 फुट असा आहे.

याबाबत माहिती देताना आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टीसाठी ब्रांझमध्ये  तयार झाले आहे. भीमसृष्टीसह सुशोभीकरणाचे कामे युध्दपातळीवर सुरु आहेत. महापरिनिर्वाणदिनाच्या अगोदर काम पूर्ण करुन उदघाटन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like