Pimple Nilakh News : पिंपळे निलख येथे व्यावसायीकाच्या घरात घरफोडी

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथे व्यावसायीकाच्या घरात घरफोडीतून 50 हजार रुपयांचा (Pimple Nilakh News) ऐवज चोरून नेला आहे. ही चोरी रविवारी (दि.22) ते सोमवारी (दि.23) या कालावधीत पिंपळे निलख येथील प्रेस्टनवूड  सोसायटी येथे घडली आहे.

अनुजा अविनाश कुलकर्णी (वय 38 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chakan Crime News : तंबाखूचे व्यसन अन लिफ्ट देणे पडले महागात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश केला, त्यांनी बेडरूममधील कपाटातून 49 हजार 500 रुपयांचे सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम  चोरून नेलीआहे. सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस (Pimple Nilakh News) चोरांचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.