Chakan Crime News : तंबाखूचे व्यसन अन लिफ्ट देणे पडले महागात

एमपीसी न्यूज – तंबाखू खाण्याच्या बहाण्याने कार चालकाने एका इसमाला लिफ्ट दिली. लिफ्ट घेतलेला माणूस त्याच्या घरातून तंबाखू आण्यास जाणार तोवर लोखंडी रॉड व कोयत्याने कार चालक व संबंधीत इसमाला मारहाण करण्यात आली (Chakan Crime News)  आहे. हा विचीत्र प्रकार चाकण येथे तळेगाव रोडवर रविवारी (दि.22) रात्री घडला.

याप्रकरणी ओंकार अरविंद तरकसबंद (वय 30 रा. चाकण) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञात इसमावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

PCMC: शहरातील सीबीएससी शाळांच्या माहितीचे संकलन सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकाला घेण्यासाठी त्यांची कार घेऊन निघाले होते. रस्त्यात त्यांना तंबाखू खाण्याची इच्छा झाली, त्यांनी रोडच्या कडेला गाडी घेतली असता पेट्रोलपंपाजवळ एक एनोळखी व्यक्तीने त्यांना लिफ्ट मागितली व तंबाखू देण्याचे त्याने कबूल केले. फिर्यादी संबंधीत व्यक्तीला घेऊन आंबेठाण रोड येथील चौधरी ट्रेडर्स येथे गेले. संबंधीत व्यक्ती तंबाखू आणण्यासाठी गाडीतून उतरुन त्याच्या खोलीकडे जात (Chakan Crime News)  असताना अचानक दोन अज्ञात व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन आले व त्यांनी हातापायाने व रॉडने मारहाण कऱण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी यांनाही मारहाण करत जखमी केले. त्यामुळे लिफ्ट देणे व तंबाखू खाण्याचा अट्टहास फिर्यादी यांना चांगलाच महागात पडला आहे. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.